महाराष्ट्र सिंधुदुर्ग

“उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले”

सिंधुदुर्ग | भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी समाचार घेत राणेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरेंमुळे राणेंना गेल्या 15 वर्षात स्वतःच्या पक्षासह अनेक पक्ष विसर्जित करावे लागले. पक्ष सोडावे लागले त्यामुळे राणेंचा उद्धव ठाकरेंवर राग असणे स्वाभाविक आहे, असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

गेल्या 15 वर्षात नारायण राणेंनी अनेकदा टीका केली मात्र उद्धव ठाकरेंसाठी राणे हा विषय संपलेला आहे. त्यांनी 15 वर्षात कधीही राणेंचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली नसल्याचं वैभव नाईक म्हणाले.

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजप, मोदी सरकार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राणे परिवारावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमत्र्यांवर जोरदार टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

पॉवर-प्लेमध्ये हैदराबादच्या वॉर्नर आणि साहाने दिल्लीकरांना दणका देत केला मोठा पराक्रम

कमल नाथ, दिग्विजय सिंह हे प्रदेशमधील मोठे सर्वात मोठे गद्दार- ज्योतिरादित्य शिंदे

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या