बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”

मुंबई | मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेेनेला शह देण्यासाठी राणेंनी मंत्रिमंडळात स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक नाही. याआधीच सेनेनं आणि कोकणाने राणेंना धडा शिकवला आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.  वैभव नाईक यांचे राणे पिता-पुत्रांसोबत अनेकवेळा खटके उडताना दिसतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर निलेश राणे, नितेश राणे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राणेंचं मंत्रिपद शिवसेनेला शह देण्यासाठी असल्याच्या चर्चां विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या आहे. राणे यांना मंत्रिपद देताना केवळ त्यांच्या क्षमतांचा विचार करण्यात आलेला. या व्यतिरिक्त अन्य कशाचाही विचार करण्यात आला नसल्याचं राणे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेला कोकणात फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रिपद दिलं जातंं, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेल्या हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

क्रिती सेनाॅनने ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटातील लुक केला शेअर

कौतुकास्पद! गरजूंना मोफत जेवण देणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा ब्रिटनकडून सन्मान

मंत्रिपद मिळताच ज्योतिरादित्य शिंदे मोदींविरोधात आक्रमक?, जाणून घ्या काय आहे सत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More