सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून राणे आणि शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच आमदार आणि शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये’, असे नमूद करतानाच ‘ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
राणे शिवसेना संपवायला निघाले होते पण शिवसैनिकांनी त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आणि पुन्हा जिल्ह्यात शिवसेना फोफावली, असेही आमदार वैभव नाईक म्हणाले. नितेश राणेंनी ट्विट करत स्व. बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळाला देण्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला ‘स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ’ हे नाव दिलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
‘…त्या वेळी तुम्ही काय करणार? कुठं तोंड लपविणार?’; गुरूवाणीचा अर्थ सांगत मोदींवर निशाणा
“कोरोनाने सांगितलं आहे का मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल”
…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौ
कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी