बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 मार्कानं PSI पदी हुकलेला वैभव राज्यात पहिला; अभिनंदनाचा होतोय वर्षाव

सोलापूर| महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात राहणारा वैभव नवले राज्यात प्रथम आला आहे.

वैभवचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आहे. त्याचं शालेय शिक्षण करमाळ्यातच पूर्ण झालेलं आहे. त्यानं करमाळा  शाळा नंबर 3 येथे प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण त्याने महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण केलं.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्याने पदवी घेतली. नंतर त्याने एमपीएससी परिक्षेचा अभ्यास जोमाने सुरू केला. 2016 साली झालेल्या पीएसआयच्या परिक्षेत त्याला अपयशाला तोंड द्यावं लागलं. त्या परिक्षेत त्याचा नंबर 1मार्कनं हुकला. मात्र त्यानं जिद्ध सोडली नाही त्यानं पुन्हा त्याच उत्साहात अभ्यासाला सुरूवात केली.

कधी कधी नियतीलासुद्धा कष्टापुढं झुकावं लागत तेच वैभवच्या बाबतीत घडलं 2016 साली 1 मार्कानं पीएसआयची पोस्ट गमावलेल्या वैभवचा 2018 साली झालेल्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम आला.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

राज्यात कोरोना बाधित रूग्ण वाढले, रूग्णांची संख्या 41 वर

पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद; मार्च एंडची लागणार वाट

मुंबईची लोकलसेवा बंद होणार नाही पण मुंबईकरांनो….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More