बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; मराठमोळ्या गायिकेचा धक्कादायक खुलासा

मुंबई | प्रसिद्ध मराठी गायिकेने तिच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट शेअर केल्याने सगळीकडे एकच खळबड उडाली आहे. मराठमोळ्या गायिकेची पोस्ट वाचताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

मराठमोळी गायिका वैशाली भैसने-माडे हिने फेसबुक पोस्ट शेअर करत तिच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ‘काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय’, असा धक्कादायक खुलासा वैशालीने केला आहे.

2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करणार असल्याचंही वैशालीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. वैशालीच्या पोस्टनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लावायला सुरूवात झाली आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत वैशालीला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ‘सारेगमप’च्या मंचावरून आपल्या करिअरची सुरूवात केल्यानंतर वैशालीने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी वैशालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

थोडक्यात बातम्या-

“वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहे, जेलमधे जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत”

“अलिबागचे जावई आहात जावयासारखं या, उन्माद करू नका अन्यथा…”

नॉनव्हेज प्रेमींनो सावधान, बर्ड फ्लूचे पुन्हा थैमान

“मी मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो”

“आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालेला आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More