बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ कडून शेतकरी कुटुंबातील वैशाली येडेंना लोकसभेची उमेदवारी

मुंबई | प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना यवतमाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळमध्ये झालेल्या 92व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य’ संमेलनात शेतकरी विधवा महिलांचे आणि सारस्वतांच्या समस्या निर्भिडपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांचे नाव चर्चेत आहे.

संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. परंतु वैशाली येडे यांच्याकडून या संदर्भात अद्याप होकार कळविण्यात आलेला नाही.

वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम कार्यरत आहेत.

दरम्यान, यवतमाळ-वाशीम मतदार संघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-सर्वात सुखी देशांच्या यादीत भारताची रँक घसरली! पाकिस्तानही आपल्या पुढे

-सोशल मीडियावर ‘उलटे कमळ’, भाजपविरोधात रासपची मोहीम

-समीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

-लोकांना मूर्ख समजणे मोदींनी आता सोडावे- प्रियांका गांधी

-सुजय विखेंविरूद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लोकसभेच्या रिंगणात