Top News

अटलजींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या नगरसेवकाला चपलेनं झोडलं!

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांनी चपलेनं झोडलं. सय्यद मतीन असं या नगरसेवकाचं नाव आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी  सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. मात्र त्याला सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यामुळे भाजप नगरसेवकांनी त्यांना चपलेनं मारलं.

दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी कडे करून सय्यद मतीन यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगतोय- एकनाथ खडसे

-महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात-एकनाथ खडसे

-केरळमध्ये महापूर; 97 जणांचा मृत्यू

-दलितेतर समाजाने आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा; भाजप आमदाराचं आवाहन

-शांतता प्रस्‍तापित करून वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करू- इमरान खान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या