राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

नवी दिल्ली |   आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार चिमटा काढला आहे. नफरत से नही प्यार से जीतेंगे…, अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी मोदींना प्रेमाची आठवण करून दिली आहे.

तुम्ही माझा कितीही द्वेष करा… राग करा… मी तुमच्याशी फक्त प्रेमाने वागेन….. अशा गोड शब्दांचं कोंदण असलेलं भाषण राहुल गांधींनी लोकसभेत केलं होतं. त्या भाषणानंतर राहुल यांनी पंतप्रधान मोदींना मिठी देखील मारली होती.

काल-परवा ‘हग डे’चं औचित्य साधून काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून भाजपला ‘हग डे’च्या शुभेच्छा दिल्या होत्या.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतीय तसतशी काँग्रेसची भाषा प्रेमाची होत चाललीये. प्रेमाने जग जिंकण्याची भाषा काँग्रेस करू लागली आहे. यात काँग्रेसला कितपत यश येतंय हे येणारा काळचं ठरवेल.

महत्वाच्या बातम्या-

‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

Google+ Linkedin