Valentine Day Tragedy l झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यात व्हॅलेंटाईन-डेला (Valentine-Day) एक हृदयद्रावक घटना घडली. डोमचांच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिमरिया गावात राहणाऱ्या १८ वर्षीय रुबी कुमारीने (Ruby Kumari) प्रियकराने लग्नास नकार दिल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
रुबी अकरावीत शिकत होती आणि ती मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. रुबीच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंब आणि गावात शोककळा पसरली आहे.
प्रियकर सूरजचा लग्नास नकार :
रुबीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे गावातील सूरज कुमारसोबत प्रेमसंबंध होते. हे नाते गेल्या वर्षी उघडकीस आले, जेव्हा कुटुंबाने रुबीचे लग्न गिरिडीह जिल्ह्यातील एका मुलासोबत निश्चित केले होते. परंतु, सूरजला (Suraj) याची माहिती मिळताच त्याने त्या मुलाच्या कुटुंबीयांना दूरध्वनी करून रुबीसोबतच्या प्रेमसंबंधाबाबत सांगितले.
यामुळे रुबीचे लग्न मोडले आणि तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळाली. प्रकरण इतके वाढले की गावात पंचायत बोलावण्यात आली, ज्यात सूरजने (Suraj) स्वतः कबूल केले की तो रुबीवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करेल. सूरजच्या कुटुंबीयांनीही या नात्याला होकार दिला आणि एप्रिल महिन्यात दोघांचे लग्न निश्चित करण्यात आले.
Valentine Day Tragedy l लग्नाच्या तयारीत असताना विश्वासघात :
लग्न ठरल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली होती. पण अचानक व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी सूरजने (Suraj) रुबीला दूरध्वनी करून लग्नास नकार दिला. हे ऐकून रुबीला मोठा धक्का बसला. तिला हा नकार सहन झाला नाही आणि ती तीव्र मानसिक तणावात गेली. याच तणावाखाली तिने घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय आणि गावातील लोक तिला बाहेर काढेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर, गावात शोककळा :
रुबीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आई-वडील आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. संपूर्ण गावात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे, आणि लोक सूरजच्या (Suraj) निर्णयावर संताप व्यक्त करत आहेत. पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सूरजची जबानी नोंदवत आहेत. ही घटना प्रेम आणि नात्यांमधील विश्वासाच्या अभावाची वेदनादायक कहाणी पुन्हा एकदा अधोरेखित करते.