मुंबई | आज व्हॅलेंटाइन डे प्रेमचा गुलाबी दिवस म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करत असतात. अनेक जण मित्रमैत्रिणींना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देत असतात. या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरात चिमटा काढला आहे.
हा दिवस स्वच्छ आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असू द्या…गॅसचे दर 910 रुपये प्रती सिलेंडर झालाय, असा टोला रोहित पवारांनी मोदी सरकारला लगावला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडताच केंद्र सरकारने दिल्लीकरांसाठी गॅसचे दर144 रुपयांनी वाढवले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी व्हॅलेंटाइन डेचा मोका साधत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, इंडियन ऑइलने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
गेल्या 20 दिवसांपासून हार्दिक पटेल गायब; पत्नी किंजलचा दावा
औरंगाबादचं नाव संभाजीनगर होत असेल तर यात वावगं काय?- राज ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या
महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ देण्यात द्यावा; काँग्रेस खासदाराची मागणी
‘मी शपथ घेते की प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’; ‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींचा निर्धार
Comments are closed.