सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

Dhananjay Munde

Dhananjay Munde l दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. अशातच बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. मात्र या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आल्याने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. मात्र या घटनेवर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वाल्मिक कराड हे आमदार धनजंय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. मात्र आज या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. “त्यांच्या सख्ख्या भावाने आमदार धनंजय देशमुख यांनी स्वत: स्टेटमेंट केलं आहे. ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबंध लावणं म्हणजे यांना यामध्ये राजकारण आणायच आहे.

मात्र मूळात आता हा विषय सभागृहात आणला आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: यावर बोलणार आहेत. तसेच ही घटना का झाली? तसेच कशी झाली? यामध्ये काय कारण आहे? तसेच कोण जबाबदार आहे? याशिवाय यासंदर्भात काय चौकशी झाली? तसेच किती आरोपींना अटक झाली? याबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, त्यामुळं तो पर्यंत थांबा असं आमदार धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Dhananjay Munde l वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडेंचा फोटो होतोय व्हायरल :

दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचा फोटो व्हायरल होत आहे. तसेच त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात, तसेच अनेकजण फोटो काढतात. त्यामुळेच मला आज दीड तास उशिर झाला आहे. तसेच त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, आम्हाला तो द्यायचा असतो. तसेच ते त्या फोटोच व्यक्तीगत जीवनात काय करतात? मात्र याचा संबंध आमच्याशी येत नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

“याशिवाय अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असं कधीही आम्हाला जमलं नाही. तसेच आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलेलं नाही” असं देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

News Title : Valmik karad named in santosh deshmukh assination murder case dhananjay munde 

महत्वाच्या बातम्या –

“माझं मंत्रिपद कोणी नाकारलं”, छगन भुजबळ कडाडले

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

‘…तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

‘पुष्पा 2’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार? जाणून घ्या कधी व कुठे

शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार बंडाच्या तयारीत?, प्रोफाइलवरून धनुष्यबाण हटवलं

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .