डॉ. वळसंगकरांच्या सुनेचा मनीषा मानेला फोन, कॉल रेकॉर्डिंगमधून धक्कादायक खुलासा?

Dr. Shirish Valsangkar

Dr. Shirish Valsangkar | सोलापूर येथील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस उलटले असून, तपासात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या रात्रीच त्यांच्या सून डॉ. शोनाली यांनी संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेला (Manisha Musale Mane) फोन केला होता आणि हे संभाषण मनीषाने रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

आत्महत्येच्या रात्रीचं संभाषण रेकॉर्ड

प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी १८ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच रात्री उशिरा, डॉ. वळसंगकर यांच्या सून डॉ. शोनाली यांनी एसपी न्यूरोसायन्स (SP Neurosciences) रुग्णालयातील कर्मचारी आणि या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेला फोन केला होता.

एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, या फोन कॉल दरम्यान डॉ. शोनाली यांनी मनीषाला (Manisha Mane) जाब विचारला. “तू अश्विन (Ashwin) आणि सासू उमा  यांना केलेला ई-मेल सासऱ्यांनाही केला होता का? तुझ्यामुळे सासऱ्यांनी आत्महत्या केली. तुला काय कमी होते?” असे प्रश्न विचारताच कॉल कट झाला. मात्र, मनीषाने (Manisha Mane) हा कॉल रेकॉर्ड केला होता, जो आता पोलिसांच्या तपासाचा भाग बनला आहे. विशेष म्हणजे, मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड्स नसताना फक्त हाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचं पोलीसांनी सांगितलं.

Dr. Shirish Valsangkar | तपासाची दिशा

डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडल्यानंतर त्यांना तात्काळ त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दीड तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, गंभीर घटना असूनही रुग्णालयासमोर जमलेल्या गर्दीसाठी अंत्यदर्शन खुले करण्यात आले होते.

उपचारादरम्यान डॉक्टरांचे कपडे काढण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी (१९ एप्रिल) पोलिसांनी या कपड्यांची तपासणी केली असता, पॅन्टच्या खिशात सुसाईड नोट (Suicide Note) आढळली. ही नोट डॉ. उमा यांना दाखवण्यात आली आणि त्याआधारे पोलिसांनी शनिवारी रात्री मनीषा मानेला (Manisha Mane) अटक केली. आता या कॉल रेकॉर्डिंगमुळे आणि इतर तपासातून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title- Dr. Valsangkar Case: Daughter-in-law’s Call to Accused Recorded

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .