बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरात ‘ही’ काळजी घ्या; एम्सच्या संचालकांचा मोलाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशात ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

एअरोसोल इन्फेक्शन म्हणजे हवेतील असे कण की जे रोगांच्या किटाणू किंवा विषाणूंनी तयार झाले आहेत. ड्रॉपलेट इन्फेक्शन हे शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून होते. हे इन्फेक्शन एअरोसोल इन्फेक्शनपेक्षा वेगळं आहे. ड्रॉपलेटसमध्ये 5 मायक्रॉनपेक्षा मोठे कण असतात, पण फार दूरवर पसरु शकत नाहीत. ते हवेत जास्तीत जास्त 2 मीटर अंतरापर्यंतच प्रवास करु शकतात आणि नंतर खाली पडून जातात असं, डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय.

एअरोसोल इन्फेक्शनमध्ये दूषित कण 5 मायक्रॉनपेक्षा छोटे असतात. ते हवेसोबत दूरवर पसरु शकतात. अशातच जर संक्रमित रुग्ण खोलीत शिंकला किंवा खोकला तर तो खोलीतून बाहेर पडल्यानंतरही अनेक तास विषाणू त्या खोलीतच असतो. त्यामुळे अशा खोल्यांमध्ये पुरेसे व्हेंटिलेशन असणं गरजेचं आहे, असं रणदीप गुलेरिया म्हणाले.

कोणत्याही बंदिस्त जागेच्या तुलनेत उघड्या जागेत विषाणू पसरण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे उन्हाळ्यातही घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शक्य असल्यास एका खोलीत जास्त लोकांनी एकत्र येणं टाळावं. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खोली हवेशीर असावी, असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“अजित पवारांनी झोप कमी करून पुण्याकडं लक्ष द्यावं, अन् झेपत नसेल तर…”

गजा मारणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; माजी खासदार संजय काकडेंना अटक

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

धक्कादायक! नाशिकमध्ये चक्कर येऊन एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू

तिसरं मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More