पुणे | पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना होती. या दंगलीला त्यांचीच फूस होती, असा आरोप बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली.
उफाळलेल्या दंगलीला तत्कालिन राज्य शासन जबाबदार आहे, असा आरोप मेश्राम यांनी केली आहे. तसंच या दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत, असंही वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, हे पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर सादर करण्यात आले आहेत. यानंतरही तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना क्लिनचिट दिल्याचं म्हटलं होतं, असं मेश्राम यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत; हर्षवर्धन जाधवांचा गंभीर आरोप https://t.co/BPGhrXTbLV @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
“जात, धर्म, प्रांत भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया”- https://t.co/7qFLnPEXoP @AjitPawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
गृहखातं कोणाला द्यायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- अजित पवार https://t.co/Sz7i6jJg9O @AjitPawarSpeaks @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.