“ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार, दम असेल तर शिवसेनेनं आडवून दाखवावं!”

पुणे | एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी 25 तारखेला मुंबईत येणार आहेत. दम असेल तर शिवसेनेनं त्यांना आडवून दाखवावं, असं आव्हान डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी केलं आहे.

कोल्हापूर येथे वंचित बहुजन आघाडीची सभा होती. या सभेला असदुद्दिन ओवैसी उपस्थित राहणार होते. मात्र यावर शिवसेनेनं आक्षेप घेतला होता.

सभा घेतली तर ती उधळून लावू, अशी धमकी शिवसेनेनं दिली होती. याचा जोरदार समाचार कांबळे यांनी सभेत बोलताना घेतला.

ओवैसींना रोखण्याची तुमच्यात ताकद नाही. आज ते आले नाहीत, पण मुंबईत ते नक्की येणार. दम असेल तर त्यांना आडवून दाखवा, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘कॅन्सर’शी झूंज देत असलेल्या मनोहर पर्रिकरांचा ‘मेरा परिवार, भाजप परिवार’मध्ये सहभाग

-लोकसभा निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार- देवेंद्र फडणवीस

राजनाथ सिंहांनी नाकारला सोन्याचा मुकुट, म्हणाले…

-जळणाऱ्यांनो जळत रहा!; सामनातून भाजपला वाकुल्या

मतदारांसमोर हात जोडून-झुकून जा, विरोधकांसमोर ठोकून जा- आशिष शेलार

Google+ Linkedin