महाराष्ट्र मुंबई

‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.

बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता वंचितचे आणखी दोन आमदार सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत.

आज अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार श्री. बळीराम शिरस्कर आणि श्री. हरिदास भदे यांनी श्री. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.@PawarSpeaks @Jayant_R_Patil pic.twitter.com/5SbMWP8P2J

— NCP (@NCPspeaks) June 3, 2020

ट्रेंडिंग बातम्या-

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार

“सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल”

महत्वाच्या बातम्या-

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या