बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गुंडगिरी प्रवृत्तीची लोक राजकारणात येतात तेव्हा…’; प्रकाश आंबेडकरांची निलेश राणेंवर टीका

मुंबई | गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यावरुनच प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे.

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही. कोणालाही शारिरिक व्यंगावरून हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथीदेखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

पण निलेश राणेंनी जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे आहोत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

महत्वाच्या बातम्या-

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More