महाराष्ट्र मुंबई

“त्या शिवसेना खासदारावर कारवाई करून आम्हालाही नाईक कुटुंबीयाप्रमाणे न्याय द्या”

मुंबई | दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबीयांना वार्‍यावर सोडणार नाही. त्यांना नक्की न्याय मिळेल, असें वचन दिलं होतं. याची आठवण वंदना ढवळे यांनी करून दिली आहे. त्या उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा सवालही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या आत्महत्येस ओम राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक जबाबदार असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. तरी देखील घटना घडल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं नसल्याचं ढवळे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच!

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या- देवेंद्र फडणवीस

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे- मुकेश खन्ना

अर्णबला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, हरिश साळवेंच्या प्रश्नावर कोर्ट म्हणालं…

गोव्यात आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या