देश विधानसभा निवडणूक 2019

विमानात राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांनी मागवलं ऑमलेट अन् मिळालं…

Loading...

नवी दिल्ली-  पुणे-दिल्ली  फ्लाईटमधील प्रवासात राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांना फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळलं. याची तक्रार झाल्यानंतर एअर इंडीया कंपनीने संबंधित कॅटररला हँडलिंग चार्जेस आणि पूर्ण फ्लाईटच्या खाद्यपदार्थाची रक्मक भरुन देण्याचा दंड आकारला आहे.

एअर इंडीयाच्या विमानात दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे-दिल्ली प्रवास करत असताना मी ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट मागवलं. त्यात मला अंड्याच्या कवचाचे तुकडे दिसले, असं त्यांनी सांगितलं. त्याचे फोटो ट्वीट करत चव्हाण यांनी एअर इंडीयाच्या सुविधेवर संताप व्यक्त केला आहे.

Loading...

विमानात दिल्या गेलेल्या खाद्यपदार्थात कुजलेले बटाटे, अर्धवट शिजलेले दाणे, जॅमच्या डब्यावर पांढुरकी पावडर अशा गोष्टीही दिसून आल्या. मी एअर इंडीयाकडे तक्रार केली आहे. याबद्दल कारवाई केली जाईल अशी अपेक्षा करते, असं त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय,डिजीसीए,नागरी उड्डाण मंत्रालय आणि मंत्री हरदीप पुरी यांना चव्हान यांनी ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. एअर इंडीयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित केटररला दंड दिल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

Loading...

 

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या