Vanraj Aandekar | माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
या प्रकरणात वनराजच्या (Vanraj Aandekar) सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. कौटुंबीक वाद आणि पैस यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
वडिलांचा अत्यंत धक्कादायक खुलासा
वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वनराज यांच्या दोन बहिणी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपी निष्पन्न झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
Vanraj चा खून सख्ख्या दाजीने केला
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकर यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपच्या 2 आमदारांमध्ये वादाचा भडका, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा
एकनाथ शिंदेच्या मुलाला फायदा होण्यासाठी… भाजप आमदाराकडूनच शिंदेंना तडाखे
मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली
राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!
पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार