Vanraj Andekar | पुण्यातील नाना पेठेत रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल 1 सप्टेंबररोजी भर चौकात 5 राऊंड फायर करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी कोयत्याने देखील वार केले. यामध्ये वनराज आंदेकर यांचा मृत्यू झालाय. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे. (Vanraj Andekar )
व्हायरल व्हिडिओमध्ये नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्यावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार केला. आता याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एकही गोळी लागली नाही. पण, गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
5 राऊंड फायर तरी, एकही गोळी लागली नाही
या प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते, तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार केला. गोळीबाराच्या आधी डोके तालीम भागामध्ये वीज पुरवठाही खंडीत झाल्याची माहिती मिळत आहे.
वनराज आंदेकर यांच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. यापूर्वी पुण्यात शरद मोहोळ यांची देखील हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा असा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे.(Vanraj Andekar Murder )
दरम्यान, वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यातील एक संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची चर्चा आहे.
नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा-
गेल्या 25 वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. (Vanraj Andekar )
News Title : Vanraj Andekar Firing and Murder Case Update
महत्वाच्या बातम्या-
ऐन सणासुदीत महागाईचा भडक, भाजीपाल्याचे दर पोहोचले शंभरी पार
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही? अशाप्रकारे चेक करा
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, आजही धो-धो बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
मराठवाड्यात पावसाचा कहर! नांदेड, यवतमाळ व हिंगोलीत अतिवृष्टी, अनेक नद्यांना पुर
वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर