Vanraj Andekar Murder | पुण्याच्या मध्यभागात काल ( 1 सप्टेंबर) रात्री सुमारे साडेआठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेमध्ये 5 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांन संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. (Vanraj Andekar Murder)
पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात (Pune Crime News) वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणी तिघांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.पाच राऊंड फायर केल्यानंतर वनराज यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार देखील करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच वनराज यांचा मृत्यू झाला.(Vanraj Andekar Murder)
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यातील एक संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची चर्चा आहे.
कोण आहेत वनराज आंदेकर?
वनराज आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. तर, वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर 2007 आणि 2012 मध्ये दोनवेळा नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते.(Vanraj Andekar Murder)
News Title : Vanraj Andekar Murder Case 3 people in custody
महत्वाच्या बातम्या-
पुणे हादरलं! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार व कोयत्याने वार करून हत्या
आज शेवटच्या श्रावण सोमवारी ‘या’ राशींचं भाग्य उजळणार, नशिबात सुख-समृद्धी देणार
‘…अन्यथा तुतारी वाजवू’; राष्ट्रवादीच्याच नेत्याचा अजित पवारांना इशारा
मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसह संपवलं आयुष्य
भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!