‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’; पोलिसांसमोर धमकी दिलेली ती कोण?

Vanraj Andekar | पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची भररस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. 5-6 बाईक्सवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.

हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आंदेकरांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पुण्यासारख्या शहरात, रात्री, वर्दळीच्या जागी भररस्त्यात असा गुन्हा घडतो, कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हल्लेखोर एकाचा थेट जीव घेतात या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून शहरात दहशतीचं वातावरण आहे.

‘वनराज… तुला पोरं बोलवून ठोकतेच’

आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनराजच्या (Vanraj Andekar) बहिणीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर त्याला धमकी दिली होती. आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते अशा शब्दात धमकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली.

वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केल्याचा पोलिसांना संशय आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.

दरम्यान, पुण्यातच काही महिन्यांपूर्वी  कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

कोण आहे Vanraj Andekar ?

वनराज आंदेकर 2017 ते 2022 मध्ये नगर सेवक होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर वनराजची आई राजश्री आंदेकर या देखील नगरसेवक होत्या. त्यांनी दोन वेळा नगर सेवक पद भूषवलं होतं. तर वनराज आंदेकरचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते. त्यांच्या कुटुंबातील आणखी एक महिला, वत्सला आंदेकर यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय, मोठी माहिती समोर

सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव

विधानसभा तोंडावर असतानाच अजित पवारांच्या अडचणीत वाढ!

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर!

ऐन सणासुदीत महागाईचा भडक, भाजीपाल्याचे दर पोहोचले शंभरी पार