Top News

वऱ्हाड निघालं मोर्चाला!!! चक्क आंदोलनातच लावलं लग्न…

अकोला | मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज संपुर्ण महाराष्ट्र बंद आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. अकोल्यातील अकोट जिल्ह्यात मराठा आंदोलनात मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालं.

अकोट तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदनमध्ये तेजस्विनी आणि अभिमन्यू या दोघांचा विवाह होता. तेव्हा लग्ना आधी वऱ्हाडी मंडळींनी जवळील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, वधू वर मंडळी आंदोलनस्थळी दाखल झाले मराठा आरक्षणाच्या घोषणा देत चक्क आंदोलनस्थळीच या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. त्यामुळे मराठा आंदोलनात हे आगळं वेगळं रूप पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या–

-धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे मुलं सापडले

-अॅट्रॉसिटीबाबत सर्व पक्ष गप्प का?

-औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

-राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी!

-पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या