पुणे | भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांनी पाठिंबा जाहिर केला आहे. महेश लांडगे हे राष्ट्र आणि समाजहिताचे काम प्रभावीपणे करत असल्याने हा पाठिंबा जाहिर करण्यात आल्याचे या संस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जीवनविद्या मिशन, राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड, अविरत श्रमदान एक पाऊल भावी पिढीसाठी, परशुराम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचा त्यात समावेश आहे.
भोसरी परिसरातील जनसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या लांडगे यांच्या शुद्ध हेतूला आम्ही सदैव खंबीरपणे साथ देऊ. महेशदादा यांना येत्या विधानसभेत भरघोस यश प्राप्त होवो, अशा सदिच्छा जीवनविद्या मिशनने दिल्या आहेत.
महेश लांडगे यांना विविध संस्था संघटनांच्या वतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला. राजपूत समाज संघठन पिंपरी चिंचवड या संस्थेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस तसेच सचिव श्रीराम परदेशी यांनी संघटनेचा पाठिंबा लांडगे यांना जाहिर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास” – https://t.co/ieagA7EHtw @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
सोशल मीडियाच्या हवेवर जाऊ नका… तो भ्रम आहे; सुरेश धस यांची रोहित पवारांवर टीका https://t.co/7NuvyE67Ui #suresh_dhas @RohitPawarSpeak
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
“महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता”- https://t.co/8eiXEW9oIb #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
Comments are closed.