दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती!
मुंबई | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत आहे, असं सांगितलं आहे.
विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
दरम्यान, 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने केलं धक्कादायक कृत्य!
…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे
“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”
चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना
कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Comments are closed.