मुंबई | आदित्य ठाकरेंची पद्म पुरस्काराच्या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्य आहे. आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
जर एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल, त्यांच्यात काम करण्याची जिद्द असणं महत्त्वाचं आहे. आदित्य यांच्यात ही जिद्द आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम केलं जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. याची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. यावर देखील वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलंय.
दरम्यान, मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे. ते सत्यता बाहेर आणतील, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या भीतीने खांदा द्यायला देखील कुणी आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला
‘सिल्व्हर ओक’वरील पाच जणांना कोरोनाची लागण
सोनू सूदने दिलेला शब्द पाळला; पुण्याच्या ‘वॉरीयर आजी’चं ते स्वप्न लवकरच सत्यात उतरवणार
मठात 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशात मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या; शेतात सापडला मृतदेह