Top News महाराष्ट्र शिक्षण

दिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड

मुंबई | राज्यातील शाळा केव्हापासून सुरू होणार यासंदर्भातील माहिती समोर आलीये. दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा त्याचप्रमाणे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार, असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीये.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “पहिल्यांदा नववी ते बारावी या इयत्तांचे वर्ग सुरु केले जातील. त्यानंतर बाकी परिस्थिती पाहता उर्वरित वर्ग टप्प्याटप्याने सुरु केले जाऊ शकतात.”

नववी आणि बारावी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं असल्याने त्याचे वर्ग सुरु करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. सरसकट शाळा सुरू करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

एक बाप म्हणून मी माफी मागतो, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही- कुमार सानू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या