बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्याचा कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे.

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्यात.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक – दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही शिक्षण विभागानं सांगितलंय. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय.

दरम्यान,  गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवलं. खरतर पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या- 

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी

क्या बोलता क्या चीज है पैसा! ; आयपीएलचे हे तीन संघ करतात ‘इतक्या’ कोटींची कमाई

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही; रुग्णांसाठी हाॅटेल्स घेतल्या भाड्याने

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More