विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
मुंबई |गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीने सर्वंच क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणाच नुकसान केलं आहे. त्यातच शिक्षण क्षेत्राचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात अनेक परिक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यातच दहावी आणि बारावीच्या विदयार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. त्यानंतर आता वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही मुलांची मागणी ऑफलाईन पद्धतीने परिक्षा घेण्याची मागणी आहे तर काही मुलांची ऑनलाईन पद्धतीने घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परिक्षा घेण्यात अडचणी आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे.
राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परिक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांना कोरोना आणि परिक्षा असं दुहेरी टेन्शन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता आम्ही परिक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना दूर जाऊ लागू नये म्हणून ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परिक्षा घेण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यापुर्वी आम्ही चर्चा करतोय. आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखाशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावलं आहे. त्यांचं म्हणण आम्ही ऐकूण घेवू, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेवू, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’; गिरीश बापटांच्या वक्तव्याची एकच चर्चा
ऑफलाईन परीक्षेवरून वाद पेटला, वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?; किरीट सोमय्यांचा खोचक सवाल
राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे नाराज, म्हणाले…
“पैसे कमविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत”
Comments are closed.