Top News

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ हजर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बैठकीतील सरदेसाई यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं सचिवपद असलं, तरी ते ना लोकप्रतिनिधी आहेत, ना सरकारी अधिकारी. त्यामुळे पर्यटन विषयक बैठकीला सरदेसाईंनी हजेरी लावल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वरुण सरदेसाई राज्य शासनाच्या सचिवांच्या बैठकीत काय करत आहेत? तेही मंत्रालयात, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलावलं असल्यामुळे आपण बैठकीला उपस्थित राहिलो होतो, असं स्पष्टीकरण वरुण सरदेसाई यांनी दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या