बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोरा-वरुण धवनचा हॉट अंदाज; ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’चा ट्रेलर रिलीज

मुंबई | ‘एबीसीडी’ सिरीजचा तिसरा भाग असलेल्या ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा यांनी केले आहे.  ‘स्ट्रीट डान्सर 3D’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ हा चित्रपट येणार आहे. सिनेरसिकांचा या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डान्सवर आधारित असलेला डान्स म्हणजे नृत्यप्रेमींसाठी पर्वणीच. याआधी रेमो च्या ‘ABCD’ आणि ‘ABCD 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता अजून त्यात काही आधुनिक नृत्याचे बदल करुन अजून हटके अंदाजात हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटातील एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘गरमी’ असं या गाण्यात अभिनेता वरुण धवन, हॉट अभिनेत्री नोरा फतेही थिरकताना दिसणार आहे. हे गाणे सुप्रसिद्ध रॅपर बादशहा आणि गायिका नेहा कक्कर हिने गायिले आहे. या गाण्यात नोराच्या हॉट लूक असणाऱ्या डान्सला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटांसारखाच यशस्वी होणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून २४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More