बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पत्नीला धोका दिला तर माझा कुत्रा भुंकायला लागेल’ -वरूण धवन

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून हॉटस्टारवर कॉफी विथ करणचा सिझन 7 (Koffee With Karan Season 7) चालू आहे. या शोच्या नवीन एपिसोडमध्ये अनिल कपूर Anil Kapoor आणि वरूण धवन Varun Dhawan यांनी हजेरी लावली.

या शोमध्ये बोलताना या दोघांनीही लग्न, नातेसबंध आणि इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या स्पर्धे विषय चर्चा केली. तसंच अनिल कपूर आणि वरूण धवन यांनी त्यांच्या फॅन्सला लग्नाबद्दल काही टिप्स देखील दिल्या.

वरूण धवनने करण जोहरला आठवण करून दिली, तो म्हणाला की, माझ्या आयुष्यात एक नवीन कनेक्शन आलं आहे. त्यामुळे मी कोणतंही चुकीचं कृत्य नाही करणार आणि त्यासाठी माझ्याकडे जागा ही नसेल. जे त्याच्या पत्नीला (नताशा दलाल) याच्या चुकीच्या कृत्यांबद्दल सावध करू शकते. पुढे वरूण म्हणाला की, मी माझ्या पत्नीला फसवले तर माझा कुत्रा भुंकेल आणि तिला सांगेल.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More