बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

नवी दिल्ली | येत्या 15 ऑगस्टला भारतला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत. हे वर्ष आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. या निमित्ताने गेल्यावर्षीपासून केंद्रसरकारकडून अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम रावबवली आहे, या मोहिमेतून प्रत्येक भारतीयाने 15 ऑगस्ट दिवशी आपल्या घरावर तिरंगा लावावा, असे अवाहन मोदींनी सर्व भारतीयांना केले आहे.

मोदी यांच्या मोहीलेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र यावरून आता भाजपचे (BJP)खासदार वरूण गांधी(Varun Gandhi) यांनी आपल्याच पक्षावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हणलं आहे की, जर स्वातंत्र्य दिन उत्सव गरिंबावर भार बनत असेल तर हे दुर्भाग्य आहे.

गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, शिधापत्रिकाधारक  तिरंगा ध्वज घेण्यासाठी 20 रूपये दिले नाही, तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नसल्याचेही तक्रार या  व्हिडीओमधून करण्यात आली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गांधी म्हणाले की, 75 स्वातंत्र्यदिन साजरा करताना, गरिबांवर बोज बनणार असेल तर ते दुर्भाग्य आहे. राशनकार्डचा उपभोग घेणाऱ्यांना तिरंगा घेण्यासाठी मजबूर केले जात आहे, नाहीतर त्यांच्या वाटणीचे राशन त्यांना दिले जात नाही. प्रत्येक भारतीयाच्या ह्रदयात बसणारा तिरंग्याची किंमत गरिबाच्या तोंडाचा घास हिसकावून वसुल करणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

थोडक्यात बातम्या-

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी, पुढील 4 तास पाऊस झोडपून काढणार

टीईटी घोटाळा प्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More