खासदारांचे वेतन रद्द करा; खासदार वरुण गांधींची मागणी

नवी दिल्ली | देशातील आर्थिक विषमता मिटवण्यासाठी 54 अब्जाधीश आणि 449 कोट्याधीश खासदारांचे वेतन आणि भत्ते रद्द करा, अशी मागणी खासदार वरुण गांधी यांनी केलीय. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय. 

देशाची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 3 महिन्यांसाठी खासदारांचे वेतन आणि भत्ते रद्द केले होते. त्याच धर्तीवर ही वेतनबंदी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

कृषीवरील संकट वाढलंय. शेतकऱ्यांना कवट्या घेऊन जंतरमंतरवर आंदोलन करावं लागतंय. तर दुसरीकडे दशकभरात खासदारांच्या वेतनात 400 टक्कांची वाढ झालीय. फायद्यात चाललेल्या खासगी कंपनीतही एवढी वाढ होत नाही, असं वरुण गांधी यांनी म्हटलंय.