बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वरूण सरदेसाई यांची पोलिसांना शिवीगाळ???; व्हिडीओ ट्विट करत मनसेचा गंभीर आरोप

मुंबई | काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला वाद शिगेला पोहोचला आहे. त्यानंतर आता नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. त्याआधी जुहूमध्ये राणे समर्थक आणि शिवसेना यांच्यात राडा झाला. युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वात जुहूमध्ये शिवसेनेने आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी पोलिसांना अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळी जुहूमध्ये तणावाचं वातावरण होतं. राणे समर्थक आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले होते. त्यावेळी दोन्ही कार्यकर्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला आले. पोलिसांनी दोन्ही गटांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्यानं कार्यकर्त्यांच्या हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांवर लाटीचार्ज केला. त्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर मनसेने ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत.

वरूणजी तुमच्या सुसंस्कृतपणाचे आज दर्शन घडल्याबद्दल तुमचे आभार. मुंबई पोलिसांची हिंमत काढायची तुम्हाला गरज नाही. छातीवर गोळ्या खावून त्यांनी मुंबईचं रक्षण केलंय. आपण केलेलं कृत्य मुंबई पोलीस कधी विसरणार नाहीत, असं ट्विट मनसे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे. त्यासोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

दरम्यान, नारायण राणे अटक होणार अशी शक्यता सकाळपासून वर्तवण्यात येत होती. त्यानंतर दुपारी नारायण राणे यांनी अटक करण्यात आली आहे. मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर सेना आणि नारायण राणे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. तो वाद आता शिगेला पोहोचला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘फक्त 1 कोटी…’; चाहत्याच्या मागणीवर सोनू सूदचं हटके उत्तर

राणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी काढला कोंबडी मोर्चा

“तुमच्या घरात घुसून हिशोब चुकता करेल”, पाहा व्हिडीओ

करिश्मा तन्ना आणि करण बोहरा यांनी दिली ‘बिग बाॅस’वर प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शरद पवारांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More