बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे आमचे दैवत, आम्ही त्यांच्यासाठी हजार काठ्या खाऊ”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्यासमोर मुंबईभरातून युवासेना कार्यकर्ते एकत्र येत आहेत. महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांच्या भावना या आज तीव्र झाल्याचं पहायला मिळत आहेत. युवासेना नेते वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन चालू आहे.

वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिलं. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असं आव्हान दिलं होतं. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिलं.

उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी हजार काठ्या खाऊ. भाजपच्या बांडगुळांना आम्ही पळवून लावू, असं वरूण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी केली. याशिवाय, नारायण राणे यांच्या आर डेक्कन मॉलवरती शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे.

थोडक्यात बातम्या –

“तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”

नारायण राणेंना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही- भास्कर जाधव

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More