बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितेश राणेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप सिद्ध करावेत, अन्यथा…- वरूण सरदेसाई

मुंबई | आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असं युवासेना सचिव वरुण वरुण सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत. याला आता वरूण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेत नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे. तसेच मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असं वरूण सरदेसाईं यांनी म्हटलं आहे.

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलंय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, अशी टीका वरूण सरदेसाईंनी केली आहे.

दरम्यान, राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करण्याची त्यांची सवय आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि मनाला वेदना देणारे आहेत, असं वरूण सरदेसाई म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद?

‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More