Vasai Accident News l संपूर्ण महाराष्ट्रात होळी आणि धुळवडीचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच वसई जवळील भिणार गावात मात्र दु:खाचे सावट पसरले. होळी दहन करून परतत असताना एका दुचाकी अपघातात मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
होळीचा उत्सव अन् दुर्दैवी घटना :
प्रल्हाद माळी (वय 25) आणि मनोज जोगारी (वय 20) हे नात्याने मामा-भाचे होते. दोघेही भिणार गावचे रहिवाशी होते. ढेकाले येथे होळी दहनाचा कार्यक्रम पाहून परतत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भारोळ गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन संरक्षण भिंतीला जोरदार धडकले आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर गावात सणाच्या दिवशी दु:खद घटना घडल्याने वातावरण गंभीर झाले. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. होळीचा आनंद क्षणात शोकात परिवर्तित झाला.
Vasai Accident News l पोलीस तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करण्यात आली असून, नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे.
एकाच कुटुंबातील दोन तरुण अपघातात गेल्याने घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांमध्येही शोकमय वातावरण पसरले असून, सणाच्या दिवशीच अपघाताने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.