वसई हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर; मयत तरुणीच्या बहिणीचा अत्यंत गंभीर आरोप

Vasai Murder Case Update | वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात भर दिवसा भयानक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली आणि हे भयानक दृश्य लोक शांतपणे नुसते पाहत राहिले. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

भररस्त्यात लोखंडी पाना मारून आरोपीनं या तरूणीची हत्या केली. तरूणीवर हल्ला करत असताना आजूबाजूनं जाणारे नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेऊन पाहात राहिले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

मयत तरुणीच्या बहिणीचा गंभीर आरोप

आरती यादव असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे. 20 वर्षीय आरतीचा प्रियकर रोहित यादव याने रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर खून केला. या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याप्रकरणी आता आरतीच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत.

रोहित यादवने शनिवारीच आरतीला मारहाण केली होती, तसंच (Vasai Murder Case Update ) तिचा मोबाईलही तोडला होता, अशी माहिती तिच्या बहिणीने दिली आहे. यानंतर आरती आणि तिची बहीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्या होत्या. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी रोहितला समजावून सोडून दिलं. तो आता काही करणार नाही, असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा आरतीच्या बहिणीने केला आहे.

वसईमध्ये ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीची हत्या

इतकंच नाही तर, रविवारी देखील पोलिसांनी आम्हाला बरेच तास बसवून ठेवलं, पण गुन्हा दाखल केला नाही आणि आज तिची हत्या करण्यात आली, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आहे. या आरोपांमुळे हे प्रकरण अजूनच चर्चेत आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराला (Vasai Murder Case Update ) तिच्यावर संशय होता. तिचं अफेअर असल्याच्या संशयातून त्यांच्यात वादही होत होते. त्यातूनच त्याने लोखंडी पाना डोक्यात मारून हत्या केली. तिच्या डोक्यात 16 ते 17 वार केले असल्याची माहिती आहे.

News Title :  Vasai Murder Case Update

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 48 तासांत ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

बॉयफ्रेंड मिळताच पत्नीने काढला पतीचा काटा, धक्कादायक प्रकार बघून पोलिसही झाले शॉक

महाराष्ट्र हादरला! भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, लोक बघत राहिले

राजकारण तापणार! शिंदे गटाच्या नेत्याचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

“ही घराणेशाही नाही, शरद पवार आणि अजित पवारांचं कुटुंब वेगवेगळं”