जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात!

Vasant Deshmukh in police custody

Vasant Deshmukh | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली होती. यानंतर नगरमध्ये वाद उफळून आला होता. शहरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. (Vasant Deshmukh)

यानंतर कॉँग्रेस तसंच महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी वसंत देशमुख यांना रात्री उशिरा (27 ऑक्टोबर) पुण्यातून संगमनेरमध्ये आणलं आहे. देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. यानंतर त्यांची संगमनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, आज 28 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यानंतर न्यायालय देशमुख यांना कोठडी सुनवायची की नाही? याचा निर्णय घेईल. देशमुख यांना मध्यरात्री संगमनेरमध्ये आणण्यात आलं.

वसंत देशमुख यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात व त्यांच्यासह इतर 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे देखील महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त केलं जातोय. यावर जयश्री थोरात यांनी तुम्हाला कुणाला अटक करायची असेल तर मला करा, पण बाकीच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही असं म्हटलंय. (Vasant Deshmukh)

नेमकं प्रकरण काय?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात 25 ऑक्टोबररोजी सुजय विखे यांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं. “तुमच्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणातात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहे.”, असं वक्तव्य भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलं. यानंतर कॉँग्रेसकडून याचा तीव्र विरोध करण्यात आला. देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  (Vasant Deshmukh)

News Title –  Vasant Deshmukh in police custody

महत्त्वाच्या बातम्या-

कॉँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, पाहा कोण कुठून लढणार?

आज वसुबारस सण, या शुभ दिनी कोणत्या राशीला होणार फायदा?; वाचा राशीभविष्य

‘विमान क्रॅश झाल्याने काजोलचा मृत्यू?’; निधनाच्या बातमीने उडालेली खळबळ

लेकासाठी बाप उतरला मैदानात; सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात दिसणार

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .