पुणे | गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भातील वक्तव्यानं खळबळ माजवलेली पहायला मिळाली. अशातच राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर पुणे शहप प्रमुख वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे मनसेमधील कार्यकर्त्यांमधील वातावरण जोरदार पेटल्याचं पहायला मिळालं.
वसंत मोरे (Vasant More)यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पदावरुन हटवल्यानंतर एक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनं एकच खळभळ उडवली आहे. अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे” असं म्हणत साईनाथ बाबर यांचं वसंत मोरेंनी अभिनंदन केलं आहे.
वसंत मोरे यांनी मावळ्याच्या वेशातला फोटो ट्विट केला आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासोबतीचा हा फोटो आहे. दोघेही एकाच फोटोत असून वसंत मोरे मावळ्याच्या वेशात आहेत तर साईनाथ बाबर महाराजांच्या वेशात आहेत.
दरम्यान, आता नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath babar) यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.
“अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
थो़डक्यात बातम्या –
किरीट सोमय्यांची नवी खेळी, अडचणी वाढताच…
‘रशियाशी मैत्री वाढवली तर…’; अमेरिकेचा भारताला थेट इशारा
वसंत मोरेंना मनसेचा झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘या’ गोष्टींमुळे मुली जाऊ लागतात मुलांपासून दूर, वेळीच व्हा सावध
‘देशद्रोही निर्लज्ज माणूस’, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल
Comments are closed.