Vasant More | मनसेतून वंचित बहुजन आघाडी पक्षात वसंत मोरेंनी पक्षप्रवेश केला. पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांचा पराभव झाला. यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत अनेकांना प्रश्न होता. यामुळे वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला राम राम करत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आणि मशाल हातात घेत शिवबंधन बांधलं. मात्र आता त्याच वसंत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नेत्यांनी केली आहे.
वसंत मोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा
मनसे पक्षाचे पुण्याचे नेते साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, अजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत वसंत मोरेंवर (Vasant More) विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते घाणेरड्या पोस्ट सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. वसंत मोरेंविरोधात बोलायचं नाही असं पक्षाने सूचना दिल्या होत्या.
यासंदर्भात पुणे पोलिसांनी भेट घेतली होती. माझी आई आणि माझ्या बायकोबाबत घाणेरड्या पोस्ट टाकल्या आहेत. या प्रकरणामध्ये मास्टरमाईंड वसंत मोरे आहेत, असं मनसे कोथरूड विभागाध्यक्ष सुधीर धावडे यांनी सांगितलं.
वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. यासंदर्भात आम्ही पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार केलीय. वसंत मोरे यांचा वसंत आर्मी असा सोशल मीडियावर ग्रुप आहे. ते विरोधकांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करताना दिसतात.
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश
दरम्यान, वसंत मोरे हे सुरूवातीला मनसे पक्षात होते. मात्र त्यांनी मनसेला राम राम करत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा वंचित बहुजन आघाडी पक्षाला राम राम करत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.
News Title – Vasant More Against Molestation Case Should Be Registered
महत्त्वाच्या बातम्या
बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार, ‘लाडका भाऊ योजने’साठी ‘असा’ करा अर्ज
अजितदादा गटातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक शरद पवार गटात जाणार; यादी आली समोर
“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा