Vasant More | राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ मोठे ट्विस्ट घडताना दिसत आहेत. कोण कधी कुठल्या पक्षात जाईल ते काही सांगता येत नाही. अशातच आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले फायरब्रँड नेते वसंत मोरेंनी (Vasant More) नुकताच ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आधी मनसे पक्षातून ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला. तिथे त्यांना लोकसभा निवडणुकीत म्हणावा असा फायदा देखील झाला नाही. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे (Vasant More) हे ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता त्या चर्चांवर पूर्णविराम आला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते तसेच काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव देखील पक्षप्रवेश केला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना (Vasant More) एक शिक्षा दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभा निवडणुकीच्या आधी काय करत आहेत हे आम्ही पाहत होतो. कोणी काय करायचं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एका गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटतं. तुम्ही पहिले शिवसैनिक आहात. याआधी बाहेरच्या पक्षांमध्ये काय वागणूक दिली जाते हे तुम्ही पाहिलं असेल. तो अनुभव तुम्ही घेतला असाल. तो अनुभव घेत तुम्ही स्वगृही परतला. यामुळे तुमचं काम आणि महत्त्व हे आजच्या दिवशी जबाबदारीने फार मोठं आहे. शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो असं सांगितलं.
यामुळे आता तुम्हाला शिवसेना सोडल्याबाबत शिक्षा झाली पाहिजे. ती वसंत मोरेंनाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला शिक्षा देतोय. पुण्यामध्ये शिवसेना कशी वाढवता येईल याची जबाबदारी मी वसंत मोरेंना देत आहे. शिक्षा हा गंमतीचा प्रकार आला तो तसा घेऊ नका. पण ही एक जबाबदारी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभेसाठी मोरे यांनी अगोदर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. मात्र ही जागा काँग्रेसकडे गेल्याने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. पुढे मग मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र वसंत मोरेंचा (Vasant More) पराभव झाला. त्यांचे डिपॉझिट जप्त झालं.
वसंत मोरेंसह या कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन
वसंत मोरेंसोबत (Vasant More)17 शाखाध्यक्ष, 5 उपविभागाध्यक्ष, 1 शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, माथाडी कामगार ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, पक्षात ज्यांना राहायचं आहे ते राहू शकता. मात्र सर्व आपल्या मर्जीने ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. कारण पक्षात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे सर्वच ठाकरे गटात प्रवेश केला. असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
News Title – Vasant More Big Responsibility After Enter Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
खरेदीची करा घाई! Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर मिळतंय तगडं डिस्काऊंट
“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत
“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, शेतकरी नेत्याची सरकारवर टीका
“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं
एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा! केंद्राने केली मोठी घोषणा