बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वसंत मोरेंनी हॉटेलमध्ये 40 ऑक्सिजन बेड उभारले, पुण्याच्या नगरसेवकांना दाखवला आरसा

पुणे | पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे पुण्यात बेडची कमतरता जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेड असलेलं हॉस्पिटल सुरु केलं आहे.

पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असतं, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय.

पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड सुरु करावेत आणि पुणेकरांचे प्राण वाचवावेत, असं आवाहन वसंत मोरे यांनी केलं आहे.

दरम्यान, याआधी कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती.

 

थोडक्यात बातम्या- 

‘गिधाडांनो त्या कार्तिकला एकटं सोडा; आता त्याला फासावर जाण्यास भाग पाडू नका”

देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका- संजय राऊत

‘घरी जा अन्यथा, मेला तर आमची जबाबदारी नाही’; मंत्र्यानं रूग्णांना दिला धक्कादायक सल्ला

“मोदींच्या जागी आणखी कोणी असतं तर त्याला हिंदू द्रोही ठरवलं असतं”

‘मी मरेन पण माझ्या कुत्र्याला मरू देणार नाही’; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More