बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

पुणे | राज्यात विधानपरिषदेच्या (MLC Elections) निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता राज्याला महापालिका (Muncipal Corporation) निवडणुकांचं वेध लागलंय. मोठ्या प्रमाणात राज्यात पक्षांतर व्हायला सुरूवात झाली आहे. राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून पुणे महापालिकेला ओळखण्यात येतं. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (MNS Leader Rupali Thombare) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

मनसेच्या धडाडीच्या महिला नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली यांनी पक्ष सोडल्यानं आता मनसेमधील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. अशातच मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत तात्या मोरे यांनी रूपाली ठोंबरे यांच्या पक्ष सोडण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा प्रकार प्री प्लॅन असल्याचं मोरे म्हणले आहेत.

मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलेलं नाही. मात्र त्यांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांनी जे पक्षातील रिकाम टेकडे नेते अशी टीका केली आहे. ती कोणावर केली हे फक्त त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान मोरे यांनी पाटील यांना दिला आहे. पक्षांतर्गत वादाचा विषय मी राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर मिटवला होता, असंही मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसेनं आपली सर्व ताकद पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी लावली आहे. स्वत: राज ठाकरे यांनी अनेकदा पुण्याचा दौरा केला आहे. पुणे महापालिकेत सध्या मनसेचे दोनच नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्यासमोर मनसेच्या अधिक जागा जिंकण्याचं आव्हान आहे.

थोडक्यात बातम्या 

Bank worker Strike: …म्हणून उद्यापासून दोन दिवस बँका बंद

न्यायालयाचा आर्यन खानला मोठा दिलासा, ‘या’ अटींमध्ये दिली सूट

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका!

‘त्यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं पण…’ – रूपाली ठोंबरे

भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More