बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात केलेल्या कामामुळे वसंत मोरेंचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश!

पुणे | कोरोना महामारीने देशभरात हैदोस घातला होता. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. वाढत्या संख्येमुळे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी अनेक रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांनी आपला प्राण गमवला. यादरम्यान पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी लोकांची मोठ्या प्रमाणात मदत केली.

वसंत मोरेंनी एका हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोविड सेंटरची निर्मितीही केली होती. वसंत मोरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने मोरे यांचा गौरव करत त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये समावेश केला आहे.

कोरोनाने कोणत्याही संकटाला भिडण्याची ताकद दिली. आणि माझ्या कोरोना काळातील कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली याचा खूप आनंद आणि समाधान आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

मोरे यांनी दिलेल्या कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या आणि समर्पित व प्रामाणिक भावनेतून मानवी सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आल्याचा जागतिक आरोग्य संघटनेनेच्या प्रशस्तिपत्रात म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या- 

“मी इतकी व्यस्त आहे की मला बोअर व्हायलाही वेळ मिळत नाही”

“दुबळयास घाबरतं ते सरकार वृत्तीने हुकूमशाही, पण मनाने दुर्बलच असतं”

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More