बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे महापालिकेच्या जॅमरवर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा खळखट्याक हातोडा; पाहा व्हिडिओ

पुणे | पुणे महानगरपालिकेचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे कायमच चर्चेत असतात. महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुजोरी विरोधात तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला वसंत मोरे या नेहमीच धावून येत असतात.

मनसेचे आक्रमक नगरसेवक वसंत मोरे यांनी यापूर्वी खळखट्याक पद्धतीने अनेक प्रकारे निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी कोरोनाकाळात रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून शासकीय कर्मचाऱ्याची गाडी देखील हॉकी स्टिकने फोडली होती. त्यानंतर आता फळविक्री करणाऱ्या अपंग व्यक्तीच्या गाडीला महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जॅमर बसवला होता. तो काढण्यासाठी स्वतः नगरसेवक वसंत मोरे हे संबंधित ठिकाणी दाखल झाले.

अपंग व्यक्तींवर होणारा महापालिकेचा अन्याय सहन केला जाणार नाही, असं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. वसंत मोरे यांनी मनसे स्टाईल महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा विरोध करत हा जॅमर चक्क दोन हातोड्यातच तोडून बाजूला फेकला.

फळ विक्री करणाऱ्या अपंग व्यक्तीच्या गाडीला अतिक्रमण विभागाने जॅमर बसवला व त्यानंतर 3 ते 4 दिवस ती व्यक्ती दंड भरून संबंधित जॅमर काढून घेण्यासाठी प्रयत्न करत होती पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनसे स्टाईल जॅमर तोडून त्या अपंग व्यक्तीची गाडी जॅमरपासून मुक्त केली तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्यावर जी कारवाई करायची ती करा, असं खुलं आव्हान नगरसेवक वसंत मोरे यांनी दिलं आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या

टी 20 वर्ल्ड कपसाठी ‘हे’ 3 गोलंदाज घेऊ शकतात भुवनेश्वर कुमारची जागा

“गरज नसताना उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं?”

राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर अतुल भातखळकरांचं उत्तर, म्हणाले…

म्युकरमायकोसिस हा रोग चिकनमुळे पसरतोय?; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More