Vasant More | अनेक वर्षांपासून पुणे शहरात मनसे पक्ष वाढवण्याचं काम वसंत मोरे (Vasant More) यांनी केलं आहे. काही दिवसांपासून पुणे लोकसभेसाठी मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे (Vasant More) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे आता वसंत मोरे (Vasant More) यांनी भावूक होत फेसबुक पोस्ट केली आहे. (Vasant More)
काय आहे पोस्ट?
वसंत मोरे यांना उमेदवारी न देण्याबाबत शर्मिला ठाकरे यांनी अप्रत्यक्ष इच्छा दर्शवली आहे. यामुळे आता पुणे शहरात मनसे पक्ष वाढवण्यासाठी सदैव झटलेले वसंत मोरे आता भावूक झाले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार ना कोणाकडे अपेक्षा करतो”, अशी भावूक पोस्ट वसंत मोरे यांनी केली आहे.
मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी?
वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे पुणे शहरात मनसे पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये वसंत मोरे यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सध्या पुणे शहराच्या पक्षातील अंतर्गत फूट आहे का?, असा सवाल आहे.
काय म्हणाल्या होत्या शर्मिला ठाकरे?
शर्मिला ठाकरे पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मनसे नेते साईनाथ बाबर यांना मला महापालिकेमध्ये पाहायचं नाही. वरच्या पदावर पाहायचं आहे. दिल्लीत असतील तर दुधात साखर पडेल, असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे साईनाथ बाबर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
याप्रकरणावर आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकरी म्हणाले आहेत की, “सबर का फल मिठा होता है”, तर एकानं लिहिलं आहे की, “केवळ निष्ठा करायची आणि वेळ सहन करायची”, त्यानंतर एकजन म्हणाला की, “जिथं निष्ठेची कदर नाही तिथं आपण आपले निर्णय घेतले पाहिजेत”.
वसंत मोरे हे पुणे शहर मनसेचे नेते आहेत. पुणे शहरामध्ये मनसेच्या पक्षबांधणीसाठी त्यांचा खारीचा वाटा आहे. मात्र सध्या त्यांना पुणे लोकसभा निवडणूक लढवली दिली जात नसल्याने ते सध्या नाराज आहेत.
News title – Vasant More Share His Feelings Via Social Media
महत्त्वाच्या बातम्या
आखाड्यात भलतीच कुस्ती! विनेश फोगाटचा राडा; नवख्या खेळाडूकडून दारूण पराभव
CAA म्हणजे नेमकं काय रं भाऊ? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या बाबी!
“पाकिस्तानी हिंदू आता मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतील”, क्रिकेटपटूने CAA वरून मानले आभार!
सचिन तेंडुलकरची आमिर खानसाठी बॅटिंग; अभिनेत्याला होणार मोठा फायदा!
“घरी हेच शिकवलं जातं का?”, चाहत्याचा आक्षेर्पाह शब्द अन् पाकिस्तानी खेळाडू भडकला