‘मासे न खाताच…’; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं

Vasant More | कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचे अभिजीत पानसे यांनी माघार घेतली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत असून आता मनसेचे माजी नेते आणि आजी वंचित बुहजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे. सोशल मीडियावर वसंत मोरे (Vasant More) यांनी पोस्ट करत मनसेला टोला लगावला आहे.

वसंत मोरेंचा मनसेला टोला म्हणाले, “कोकणात जाऊन मासे न खाताच…”

याआधी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हा अनेकांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता तर कोकण पदवीधर मतदारसंघात जाऊन माघार घेतल्याने राज ठाकरे यांच्यावर अनेकजण टीका करत आहेत. यावरून वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील “कोकणात जाऊन काही लोकं मासे न खाताच मुंबईत परतली…”, असं वक्तव्य केलं. (Vasant More) या टीकेला आता मनसे काय उत्तर देतील? हे पाहणं गरजेचं आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली?

मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली असा अनेकांना प्रश्न पडला असेल. त्याचं कारण आता समोर आलं आहे. यावर नितीन सरदेसाई यांनी यामागील कारण सांगितलं आहे. ते माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर स्पष्टोक्ती दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांना माघार घेण्यासाठी विनंती केली होती. असं सारखं सारखं होणार नाही, असं आश्वासनही फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.

त्यानंतर आज सकाळी निरंजन डावखरे हे राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवतीर्थावर आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय घेतला असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

आमचा पक्ष हा स्वतंत्र आहे. निवडणूक लढवणे हा त्याचा भाग असून हा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला. त्यावेळी फडणवीस यांनी अशी गोष्ट वारंवार होणार नसल्याचं राज ठाकरे यांच्यासोबत बोलत असताना सांगितलं. राज ठाकरे मनसे पक्षाच्या फायद्याचा विचार करूनच निर्णय घेतात. राजकारणात काही गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही. कालांतराने फरक दिसून येतो, असं नितीन सरनाईक म्हणाले होते.

News Title – Vasant More Slam To Raj Thackeray About  Konkan Padhavidhar Matdar sangh

महत्त्वाच्या बातम्या

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’